Ad will apear here
Next
अपघातग्रस्तांच्या कुटुंबीयांना मदतीसाठी स्वतंत्र बँक खाते
दापोली (रत्नागिरी) : दापोलीच्या डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठातील ३० कर्मचारी २८ जुलैला आंबेनळी घाटात झालेल्या भीषण अपघातात बळी पडले. या दुर्दैवी घटनेत मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत देणे सोयीचे व्हावे, यासाठी विद्यापीठाच्या वतीने ‘स्टेट बँक ऑफ इंडिया’च्या दापोली शाखेत खाते उघडण्यात आले आहे.

विद्यापीठाच्या अनेक माजी विद्यार्थ्यांसह इतरही बऱ्याच जणांनी या कुटुंबांना आर्थिक मदत करण्याची इच्छा विद्यापीठाकडे व्यक्त केली होती. या सर्वांना मदतीचा निधी पाठविणे सोयीचे व्हावे, यासाठी विद्यापीठाच्या वतीने हे खाते उघडण्यात आले आहे. मृतांच्या कुटुंबीयांसाठी लवकरात लवकर मदतनिधी उभा राहण्यासाठी तातडीने हे खाते उघडण्यात आले आहे. बँक खात्याचे तपशील बातमीच्या शेवटी दिले आहेत.

दरम्यान, या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या विद्यापीठ कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना मुख्यमंत्री सहायता निधीतून प्रत्येकी चार लाख रुपयांची मदत करण्यात आली आहे. तसेच रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र वायकर यांनीही प्रत्येकी दहा हजार रुपयांची मदत केली आहे. विद्यापीठातील प्राध्यापक संघटनेची बैठक नुकतीच झाली. सर्व प्राध्यापकांनी आपले एक दिवसाचे वेतन या मृतांच्या कुटुंबीयांना देण्याचे त्या बैठकीत ठरवण्यात आले. तसेच विद्यापीठातील अन्य कर्मचारीही आपले एक दिवसाचे वेतन मदत म्हणून देणार आहेत.  

मदतनिधी पाठविण्यासाठी बँकेचा तपशील 
स्टेट बँक ऑफ इंडिया, शाखा दापोली, जि. रत्नागिरी
खाते क्रमांक : ३७८४३०७७६२९
IFSC : SBIN0001047
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/QZZIBR
Similar Posts
‘मत्स्य’च्या विद्यार्थ्यांना कोकण कृषी विद्यापीठाच्याच पदव्या मुंबई : महाराष्ट्र कृषी विद्यापीठ अधिनियम १९८३ आणि महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ अधिनियम १९९८च्या कलम नऊमध्ये सुधारणा करण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. ही बैठक चार जून २०१९ला झाली.
मत्स्यव्यवसायाच्या विकासासाठी आवश्यक संशोधनाची चर्चा रत्नागिरी : ‘शाश्वत मासेमारी आणि मत्स्य संवर्धन विकास : आव्हाने आणि संधी’ या विषयावरील आंतरराष्ट्रीय परिषद रत्नागिरीतील शिरगाव येथील मत्स्य महाविद्यालयात सध्या सुरू आहे. या परिषदेच्या दुसऱ्या दिवशी (१८ जानेवारी २०१९) सकाळी शाश्वत उत्पादन प्रणालीसह विविध विषयांवरील चर्चासत्रे पार पडली. दापोलीच्या डॉ.
मत्स्यसंवर्धनाच्या शाश्वत विकासातील आव्हानांचा वेध घेणारी आंतरराष्ट्रीय परिषद रत्नागिरीत सुरू रत्नागिरी : ‘शाश्वत मासेमारी आणि मत्स्य संवर्धन विकास : आव्हाने आणि संधी’ या विषयावरील आंतरराष्ट्रीय परिषदेला रत्नागिरीतील शिरगाव येथील मत्स्य महाविद्यालयात १७ जानेवारी २०१९ रोजी सुरुवात झाली. २० जानेवारीपर्यंत चालणाऱ्या या परिषदेत मत्स्य शाखेशी संबंधित विविध विषयांवर चर्चा होणार आहे.
सुंदर एकदांडी वनस्पती वाचवू या! एकदांडी वनस्पतीला बहर आल्यामुळे सध्या कोकणातील काही ठिकाणच्या पठारांवर स्वर्ग पृथ्वीवर आल्याचा भास होतो आहे. केवळ रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात आढळणाऱ्या या वनस्पतीच्या अस्तित्वाची ठिकाणे झपाट्याने कमी होऊ लागली आहेत. या नैसर्गिक ठेव्याचे जतन करणे अत्यंत आवश्यक असून, ते काम सामान्य नागरिकही करू शकतात

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language